rain

rain
rain

Sunday 1 April 2012

kissa

कल, ये आज भी
एक कल बनकर रह जाएगा
गुजरे हुए पलो के समुन्दर का
एक हिस्सा बनकर रह जायेगा

याद आयेंगे ये लम्हे
देख ढलते सूरज को
हमारी तुम्हारी कहानी
कल एक किस्सा बनकर रह जायेगा

...

Saturday 10 March 2012

tu me aani paoos...

पाउस येउन गेला
भिजायचं राहूनच गेलं
कोसळणाऱ्या पावसात तुला
बघायचं राहून गेलं

आता पुन्हा
पुढच्या वर्षी भिजशील
मी तेंव्हाही नसेन बरोबर
मला आठवून गोड हसशील ..

मग सांगशील मला
तुझं गुपित कानात
बरसशील होऊन पाऊस
माझ्या मनातल्या रानात

एखाद्या नाजूक  रानफुलासारखी
मनावर फिरत राहशील
'तुझ्या' पावसाचे थेंब काही
डोळ्यात देउन जाशील

"लवकर येरे एकदाच "
म्हणशील नेहमीसारखं
आणि कातरवेळी उदासीच
कारण देउन जाशील

मग ठरवू आपण पुन्हा
"एकत्र भिजायचं पावसात"
आणि भिजत राहू "ओल्या"
आठवणींच्या दिवसात ...

--  महेश.  

Friday 9 March 2012

For no reason.

इथे मिळाल आभाळ
पंख सुरेखसे छान
रात्र झाल्यावर मात्र
घर आठवते फार

इथे होते रिमझिम
येती सरीवर सर
मी बिलगु पाहता
पण राहे दूर दूर

इथे आभाळ मिळालं
पण हरवली माया
हिरमुसलेल मन 
पाहे परतुनिया जाया ...